आम्ही फारच सुजाण लोक आहोत, एवढे सुजाण की शेजारच्या घराला आग लागली तरी, आपल्या घरात धूर येतोय का? एवढा स्वतःला प्रश्न विचारून ,एवढंच पाहून झोपायचं ठरवतो.
बांगलादेशात हिंदूंना झाडाला लटकवून जाळलं जातंय म्हणे…बरं झालं ते झाड तिकडेच होतं, नाहीतर आपण आधी पर्यावरण खात्याची परवानगी काढायला लावली असती, तिथे मंदिरे जळतात,इथे आपण मेणबत्त्या शोधतो…त्या पण silent असाव्यात,कारण निषेध मोठ्याने केला तर कुणाच्या भावना दुखावल्या तर…?
आपल्याकडे बांगलादेशी लोक राहतात का? अहो..राहतात नाहीत ते परिस्थितीजन्य भारतीय आहेत, इथे मेहनत करायला आले आहेत, आधार कार्ड आहे, रेशन आहे,मतदानाचा उत्साह आहे मग उगाच पासपोर्टची हट्टधर्मिता कशाला????? काही लोक त्यांना आश्रय देतात, ते आश्रय देत नाहीत,ते राष्ट्रीय एकात्मतेचा प्रयोग करतायत, परिणामाचा अभ्यास पुढच्या पिढीने करायचा.. आणि आमचे राजकीय युवराज ज्यांना आपण तरुण म्हणतो, अहो, त्यांची अडचण समजून घ्या, देशात देशभक्ती केली तर काम करावं लागतं, देशसेवा करावी लागते, परदेशात जाऊन भारताला शिव्या दिल्या की लगेच फेलोशिप मिळते.
बांगलादेशात हिंदूंवर अत्याचार..? होईल होउद्या…आधी आपण ट्विटरवर योग्य हॅशटॅग ठरवू.निषेध करायचा पण नेटवर्कच्या रेंजमध्ये.. कधी कधी व्हॉट्सअॅपवर, तेही Forwarded as Recieved अशी जबाबदारी टाळणारी पावती जोडून. आज आपण शांत आहोत पण …… पण उद्या आग आपल्या उंबरठ्यावर आली की आपण विचारू,….“अरे हे इतकं अचानक कसं घडलं?”
एवढंच सांगू शकतो… माणूस मेल्यावर शांत होतो, पण आपण तर जिवंतपणीच स्मशानवैराग्य स्वीकारलंय, उपेक्षेलाच तत्वज्ञान बनवलेले हिंदू आहोत आपण…
कर्तव्य शून्य आणि घोषणांचा सुकाळ चला फक्त बोलूया जय श्री राम..जय जय श्री राम
अ.र.वालावलकर

Leave a comment